फेसबुकचा कायदेशीर कारवाईचा इशारा

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडून सोशल नेटवर्किंग पासवर्डची मागणी करणाऱया कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा फेसबुकने दिला आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार अशा स्वरुपाचा आग्रह धरणं हे त्यांच्या सेवेच्या विरुद्द आहे.

Updated: Mar 26, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, ह्युस्टन

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडून सोशल नेटवर्किंग पासवर्डची मागणी करणाऱया कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा फेसबुकने दिला आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार अशा स्वरुपाचा आग्रह धरणं हे त्यांच्या सेवेच्या विरुद्द आहे.

फेसबुकचे मुख्य गोपनीय अधिकारी एरिन एगन यांनी एक रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर अशा प्रकारचा इशारा दिला आहे. कंपन्या आणि सरकारी उपक्रम नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांकडून नोकरी देण्याच्या अगोदर चौकशीसाठी पासवर्डची मागणी करतात असं या रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे.

फेसुबकने आपल्या अकाऊंटहोल्डर्स लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलं आहे की नोकरी शोधणाऱ्या लोकांकडून अकाऊंटचा पासवर्ड मागण्याच्या वाढता ट्रेंड लक्षात घेता अशा स्वरुपाची भूमिका घेणं भाग पडलं आहे. फेसबुकने हे योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

फेसबुकनुसार कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अकाऊंटच्या पासवर्डद्वारा सर्व प्रकारची माहिती प्राप्त होऊ शकते आणि ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी हानीकारक ठरु शकतं. कंपन्यांनी अशा प्रकारे पासवर्डची मागणी करणं हे बेकायदेशीर आहे. कंपन्यांनी नोकरीसाठी एकाद्याची वैयक्तिक माहिती आणि अकाऊंटचा तपशील मिळवणं योग्य ठरणार नाही.