अमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे

अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.

Feb 13, 2012, 02:46 PM IST

बाबा-दादा आज आमनेसामने

पिंपरी-चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात स्वतः मुख्यमंत्री आज सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची पहिलीच जाहीर सभा पिंपरीत होते आहे.

Feb 13, 2012, 02:27 PM IST

अमरावतीत पैसे काँग्रेसनं पाठवले - पोलीस आयुक्त

अमरावतीमध्ये नाकाबंदीदरम्यान जप्त केलेली रक्कम काँग्रेसनं पाठवल्याच्या पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Feb 12, 2012, 10:55 PM IST

नागपूरमध्ये नात्यांचे 'महाभारत' !

नागपूरमध्ये सर्वच पक्षांनी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांनाच तिकीटं वाटली आहेत. आई- वडील अपक्ष तर मुलगा मनसेकडून, काका विरुद्ध पुतण्या, काका विरुद्ध पुतणी अशाही लढती रंगत आहेत.

Feb 11, 2012, 03:06 PM IST

नागरिकांच्या 'स्वाभिमाना'ची लढाई ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० या प्रभागातून प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक लक्ष्मण जगताप यांनी बंडखोर उमेदवार हर्षल ढोरे यांना पाठिंबा दिला आहे.

Feb 10, 2012, 05:40 PM IST

निवडणुकीतील 'नातीगोती'

नागपूरमध्ये सर्वच पक्षांनी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांना तिकीटं वाटली आहेत. आई- वडील अपक्ष तर मुलगा मनसेकडून, काका विरुद्ध पुतण्या, काका विरुद्ध पुतणी अशाही लढती रंगत आहेत. तीन कार्यकर्ते एकाच कुटुंबातले असून तिघेही महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

Feb 9, 2012, 11:42 PM IST

माणिकराव ठाकरेंवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Feb 9, 2012, 07:57 PM IST

माणिकरावांचं मानसिक संतुलन बिघडलंय- राठोड

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला, शिवसेना आमदार संजय राठोड यांनी लगावला आहे. मुलाला विजयी करण्यासाठी ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचंही राठोड यांनी म्हटलं.

Feb 8, 2012, 09:36 AM IST

पिंपरीत उमेदवार झाले फरार

पिंपरीत उपमहापौर डब्बू आसवानी विरूद्ध काँग्रेसच्या अमर मुलचंदानी यांची लढत लक्षवेधी ठरली आहे. मात्र दोन्ही उमेदवार फरार असल्यानं कार्यकर्तेच प्रचाराची धुरा सांभाळत आहे.

Feb 8, 2012, 12:10 AM IST

रवी राणाविरूद्ध आचार संहिता भंगाची तक्रार

मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदारांना लक्झरी बसनं तीर्थ यात्रेला पाठवून आचार संहिता भंग केल्याची तक्रार बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणांविरूध्द पोलिसांकडे करण्यात आली होती, त्यानुसार पोलिसांनी आठ ते दहा शेगावला जाणाऱ्या लक्झरी बसेसची चौकशीही केली.

Feb 7, 2012, 10:13 PM IST

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

पुणे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय.

Feb 7, 2012, 08:54 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये घडळ्याचा गजर झाला

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वैदुवस्ती प्रभागातून रामदास बोकड बिनविरोध निवडून आलेत.

Feb 7, 2012, 08:51 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये हात आणि घडाळ्यात हातघाई

मनपा निवडणुकांच्या प्रचाराचे धूमशान सुरु झालं आहे. मात्र राजकीय पक्षांमध्ये मुद्यांऐवजी गुद्याची लढाई सुरु झालीय. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.

Feb 7, 2012, 08:51 PM IST

अकोल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

अकोल्यात संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केलाय. तिकीट न मिळाल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष संदिप पुंडकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली

Feb 7, 2012, 06:29 PM IST

मनसेला धक्का.. शहराध्यक्षांचा राजीनामा

'अविनाश अभ्यंकर यांचा मनमानी कारभार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून सुभाष पाटील यांनी हा राजीनामा दिला'. 'मला राज ठाकरेयांच्यापर्यंत पोहचू दिले नाही, निवडणूक जवळ आली असतानाही योग्य यंत्रणा राबवू दिली जात नाही'.

Feb 2, 2012, 05:11 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये 'घराणेशाही'

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात तिकीटांची बरसात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार असलेल्या आमदार विलास लांडे यांच्या तब्बल पाच नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.

Feb 1, 2012, 09:00 PM IST

वस्त्र द्या, वस्त्रहरणाची भाषा नको - आबा

द्योगमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचं वस्त्रहरण करणार अशी घोषणा करताच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीदेखील नारायण राणे यांना उत्तर देत त्यांच्या वस्त्रहरणबाबत चांगलीच खिल्ली उडवली आहे. इतरांना वस्त्र देण्याऐवजी उद्योगमंत्री नारायण राणे वस्त्रहरणाची भाषा का करतात.

Jan 29, 2012, 07:32 PM IST

अकोल्यात पण युती तुटणार?

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमध्ये युतीचं फिस्कटल्यानंतर अकोल्यात देखील तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेसाठी युती एकत्र लढणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Jan 27, 2012, 10:22 PM IST

साहित्य संमेलनातून मंत्र्यांची 'EXIT'

चंद्रपूर इथं ३ ते ५ फेब्रुवारीला होणारे साहित्य संमेलनही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलं आहे. या संमेलनाला मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्यांना हजेरी लावण्यास राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मनाई केली आहे.

Jan 24, 2012, 02:38 PM IST

शिवसेना कौनसे खेत की मुली है - आझमी

सपाचे आमदार अबू आझमी यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला 'टार्गेट' करत शिवसेनेवर चांगलीच टीका - टिप्पणी केलेली आहे. 'शिवसेना कौनसे खेत की मुली है' असं म्हणून अबू आझमी यांनी शिवसेनेला अगदीच तुच्छ लेखलं आहे.

Jan 23, 2012, 07:30 PM IST