www.24taas.com, जळगाव
जळगाव जिल्ह्यातल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या तीन कॉलेजेसना सील ठोकून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानं शिक्षण सम्राटांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्माचा-यांच्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.
या संस्थेच्या संचालकांच्या दोन गटांतला अंतर्गत वाद कोर्टात प्रलंबित असताना अचानक या यासंस्थेच्या जळगाव, यावल आणि वरणगावमधल्या कॉलेजेसना सील ठोकलं. विरोधी गटानं या कारवाईबाबत समाधान व्यक्त केलं असलं तरी सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप संस्थेच्या काही संचालकांनी केली. मात्र संस्थेच्या अतंर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसला.
मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे जिल्ह्यात 15 हजारांवर सदस्य असून 28 विद्यालये आहेत. तसंच 13 वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. एवढ्या मोठ्या संस्थेवर कारवाई केल्यामुळं या संस्थेच्या शिक्षणसम्राटांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं.