www.24taas.com, झी मीडिया, सहारनपूर (उ.प्रदेश)
उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलीय. नरेंद्र मोदींचे तुकडे-तुकडे करण्याची धमकी त्यांनी दिली होती. एका प्रचारसभेत बोलताना मसूदचा तोल ढळला होता.
मोदींनी उत्तरप्रदेशचं गुजरात करण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांचे तुकडे करीन. मी मरायला घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही. गुजरातमध्ये फक्त ४ टक्के मुस्लिम आहेत. उत्तरप्रदेशात २४ टक्के मुस्लिम आहेत. अशा शब्दांत त्यांनी मोदींना जाहीर धमकी दिली होती. नंतर आपल्या या विधानाबाबत त्यांनी माफीही मागितली.
प्रचाराच्या भरात आपण असं बोलून गेलो. आपल्याला अधिक सावध राहायला हवं, असं मसूद म्हणाले होते. आता मसूद यांना अटक करण्यात आली आहे. मसूद यांच्या विधानावर भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त केलीये. मसूद यांना तातडीनं अटक करण्यात यावी आणि निवडणूक आयोगानं त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भाजप प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांनी केलीये. तर काँग्रेस खासदार राज बब्बर यांनीही मसूद यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केलीये.
ठळक बाबी
मोदींबाबतच्या आक्षेपार्ह विधानाबात अटक
...तर मोदींचे बारीक तुकडे करीन - मसूद
`मी मरणाला भीत नाही, मारायला घाबरत नाही`
मोदींची `खांडोळी`करण्याची दिली होती धमकी
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.