केस पांढरे होण्यामागची ही आहेत ५ कारणे

आज अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याचे हे प्रमाण अचानक का वाढले या बाबत अनेक कारणे आहेत. ही कारणं आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात.

Updated: Jan 18, 2016, 07:17 PM IST
केस पांढरे होण्यामागची ही आहेत ५ कारणे title=

मुंबई : आज अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याचे हे प्रमाण अचानक का वाढले या बाबत अनेक कारणे आहेत. ही कारणं आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात.

केस पांढरे होण्यामागची ५ कारणे :

१. व्यसन : व्यसन हे तसं तर अनेक आजारांना कारणीभूत असतं. याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. पण केस पांढरे होण्यामागचं हे ही मोठं कारण आहे. 

२. आजार : अनेक दिवसांपासून आजारी असल्यास केस पांढरे होण्याची शक्यता असते. कारण या वेळेत आपण मोठ्या प्रमाणात औषधाचे सेवन करतो. त्याचा परिणाम केसांच्या रंगावर होतो.

३. मेलानिन : आपल्या शरिरात मेलानिन हा रंगद्रव्य असतो जो केसाचा रंग काळा ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. शरिरात जेव्हा मेलानिन कोशिकांची निर्मिती होणे बंद होते तेव्हा केसाचा रंग बदलतो. त्यामुळे कमी वयातही केस पांढरे होतात.

४. आहार : आहार हा शरिरातील प्रत्य़ेक गोष्टीमध्य् महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपण कशा प्रकारचा आहार घेतो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आहारात जीवनसत्व-बी, प्रथिने, कॉपर आणि आयोडीन यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळेही केस पांढरे होतात. 

५. अस्वच्छता : केसाची निगा न राखणे हे देखील केस पांढरे होण्यामागचं मोठं कारण आहे. प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे केसांची निगा राखणं गरजेचं झालं आहे. 

या शिवाय ताण-तणाव, शरिरात कॉपरची कमतरता, अनुवंशिक दे देखील केस लवकर पांढरे होण्यामागची कारणे आहेत.