जाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये...

 आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक असते. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे हे विषासारखे असते. लगेच पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचन क्रियेवर पडतो. 

Updated: Jan 7, 2015, 08:14 PM IST
जाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये... title=

मुंबई :  आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक असते. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे हे विषासारखे असते. लगेच पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचन क्रियेवर पडतो. 

आपण जे खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नि खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नि ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे. 

पाणी प्यायल्याने ही जठराग्नि समाप्त होते. ही जठराग्नि जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही, गळून जाते. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. त्याने एक दुष्टचक्र सुरू होते. महर्षि वाघभट्ट यांनी १०३ रोगांचा उल्लेख केला आहे. जे भोजन केल्यानंतर पाणी प्यायल्याने होतात. 

जेवण केल्यानंतर पाऊण तासांनंतर किंवा एका तासांनंतर पाणी पिणे उचित आहे. या काळात जठराग्निने आपले काम पूर्ण केलेले असते. आपण लगेचच पाणी प्यायले तर जठराग्नि मंद पडते. त्यामुळे नीट पचन होत नाही. आयुर्वेदानुसार सकाळी अधिक पाणी पिणे, जेवल्यानंतर त्वरीत पाणी न पिणे हे अचूक नुस्खे आहेत. त्याने आपण दीर्घायुषी राहू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.