मुंबई : घरातील प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही चहाने होते. चहा न पिणाऱ्यांची संख्या जगभरात फार कमी असेल. चहामुळे सकाळचा आळस निघून जातो आणि स्फूर्ती येते. प्रवासात चहा बनवण्यासाठी टीबॅगचा वापर केला जातो. चहामध्ये वापरल्यानंतर या टीबॅग फेकून दिल्या जातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का सौर्द्यासाठी या टीबॅगचा कसा वापर होऊ शकतो ते.


टीबॅगचे असेही फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्याच्या दिवसात सनबर्नची समस्या अधिक होते. यावेळी ज्या ठिकाणी सनबर्न झालेय त्या ठिकाणी टीबॅग ठेवा. यामुळे नक्की फायदा होईल. 


अनेकांची नखे फार कमकुवत असतात. त्यामुळे ती सतत तुटत असतात. यावर टीबॅगेचा वापर गुणकारी ठरतो. 


त्वचेवर शेव्हिंगमुळे रॅशेस आल्या असतील तर त्या घालवण्यासाठी टीबॅगचा वापर होतो.


चेहऱ्यावर मुरुमे अथवा डाग असतील त्यावर ग्रीन टीचा पर्याय उत्तम आहे. 


सतत कम्प्युटर अथवा टीव्हीसमोर बसून राहिल्याने डोळे लाल होतात. यावेळी टीबॅग थंड पाण्यात बुडवून काही काळ डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांचा लालसरपणा कमी होईल.