दिल्लीत काहीही घडू शकतं - केजरीवाल

दिल्लीमध्ये ‘आप’नं सत्ता स्थापन केली असली तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ मात्र अद्याप त्यांना सिद्ध करायचंय. या दरम्यान खूप काही घडू शकतं, असं दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 1, 2014, 03:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीमध्ये ‘आप’नं सत्ता स्थापन केली असली तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ मात्र अद्याप त्यांना सिद्ध करायचंय. या दरम्यान खूप काही घडू शकतं, असं दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटतंय.
केजरीवाल यांची तब्येत ठिक नसल्यानं पत्रकारांकडून त्यांना याबद्दलच विचारपूस करण्यात आली. तेव्हा केजरीवाल यांनी ‘तब्येतीचं काय ती तर ठिक होतंच राहील. आमच्याकडे केवळ ४८ तासांचा वेळ आहे. कारण, बीजेपी आणि काँग्रेस मध्ये सध्या सुरु असलेल्या जोड-तोडीमुळे माहित नाही की हे सरकार कधीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमच्याकडे केवळ ४८ तासांचा वेळ आहे, असं धरून आम्ही काम करतोय’ असं उत्तर दिलंय.
केजरीवाल यांनी केलेला जोड-तोडीचा आरोप काँग्रेसनं पूर्णत: फेटाळून लावलाय. काँग्रेस नेता शकील अहमद यांच्या म्हणण्यानुसार, ‘काँग्रेस यापुढेही कधी आम आदमी पार्टीचं समर्थन करणार नाही... आम्हालाच माहीत नाही की ते अशा पद्धतीची वक्तव्यं का करत आहेत?’
दरम्यान, दिल्ली विधानसभा अध्यक्षपदासाठी एम. एस. धीर हे ‘आप’चे उमेदवार असतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.