देवयानी खोब्रागडे पुन्हा अटकेच्या वादळात

भारतीय राजकीय अधिकारी देवायानी खोब्रागडे यांचं नुकतंच भारतात आगमन झालंय. मात्र पुन्हा एकदा अमेरिकेतील मॅनहॅटन न्यायालयानं देवयानी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलंय.

Updated: Mar 16, 2014, 03:28 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, दिल्ली
भारतीय राजकीय अधिकारी देवायानी खोब्रागडे यांचं नुकतंच भारतात आगमन झालंय. मात्र पुन्हा एकदा अमेरिकेतील मॅनहॅटन न्यायालयानं देवयानी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलंय. व्हिसामध्ये केलेला गैरव्यवहार आणि मोलकरणीची दिलेली असत्य माहिती या आरोपाखाली हा अटक वॉरंट काढण्यात आलाय.

देवयानी भारतात असल्यामुळं त्यांची अटक वॉरंट न्यायालयाला सांगण्यात येईल. त्याचप्रमाणे न्यायलयात हजर राहण्याचा दिवसही सांगितला जाईल. तसंच त्यांना भारतातून खटला चालवता येणार नाही, असं अमेरिकेचे ऍटर्नी प्रीत भरारा यांनी जिल्हा न्यायाधीश विल्यम पॉल यांना २१ पानी पत्रातून लिहिलंय.

देवयानी यांना १२ डिसेंबरला याच कारणावरुन अटक करण्यात आली होती. मात्र भारतानं अमेरिकेच्या दूतावासावर दबाव आणला. त्यामुळं न्यूयॉर्क न्यायालयानं अटक वॉरंट रद्द केला होता. त्यानंतर देवयानी अमेरिकेमधून बदली करुन भारतात परतल्या आणि परराष्ट्र मंत्रालयात बदली करण्यात आली.

देवयानी यांनी मोलकरीणाचा व्हिसा खोट्या माहितीनं मिळवला. मोलकरीणला मिळणाऱ्या वेतन करारात खोटी माहिती देली. मोलकरीण संगीता रिचर्डकडून जास्त कामाच्या मोबदलात कमी पगार दिला. मोलकरणीला कायद्यानुसार आवश्यक पगार आणि संरक्षण देण्यास मनाई केली. तसंच मोलकरणीच्या घरच्यांना गप्प राहण्याची भीती दाखवली असे आरोप देवयानी यांच्यावर करण्यात आलेत. एवढचं नाही तर त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिल्याचा सुद्धा आरोप आहे.

देवयानी यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत असतानाच, देवयानी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायालयाने नवीन अटक वॉरंट काढल्यामुळे परराष्ट्र मंत्रालयातून निराशाजनक प्रतिक्रिया येत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.