नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी BHIM अॅप लॉन्च केलं. हा अॅप लॉन्च झाल्यानंतर तीन दिवसातच त्याने एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जवळपास २० लाख अँड्रॉइड युजर्सने हा अॅप डाऊनलोड केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेट शिवाय हा अॅप तुम्ही वापरु शकता. BHIM अॅपचं फुलफॉर्म आहे 'भारत इंटरफेस फॉर मनी'. हा अॅप UPI बेस्ड पेमेंट सिस्टमवर काम करतो. या माध्यमातून लोकं डिजिटल पद्धतीने व्यवहार करता येणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा देखील आहे की, यूजर्ससा बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड सारखी माहिती भरण्याची गरज नाही.


पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला फक्त एकदा तुमचा बँक अकाऊंट नंबर रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर एक UPI पिनकोड जनरेट होईल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अॅड्रेस असेल. प्रत्येक वेळेस अकाउंट नंबर टाकण्याची गरज नाही.


इंटरनेट नसलं तरी फोनने USSD कोड *99# डायल करुन तुम्ही अॅप वापरु शकता. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा अॅप उपलब्ध आहे.