नवी दिल्ली : भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. नोटाबंदी नंतर आजची परिस्थिती गंभीर, बॅकेत जमा झाले जितके सांगितले तितके जमा. यावरून काळापैसा सगळा पांढरा झाला आहे. भाजपच्या माध्यमातून पांढरा झाला असा आमचा आरोप, असा हल्लाबोल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला.
नोटाबंदी नंतर आजची परिस्थिती गंभीर झाली आहे. काळापैसा बँकेत जमा करत पांढरा करण्याच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ९० ट्कके लोक सभ्य आहेत. त्यांना त्रास सुरू आहे. यासगळ्यामागे मोठे षडयंत्र आहे. आता पीएम शांत आहेत. ते बोलत नाही, असे सिब्बल म्हणालेत.
पण काँग्रेस पक्ष हे जाणार आहे. साठ दिवसाचा हिशोब देऊ शकत नाही जे आम्हाला साठ वर्षांचा विचारत होते. काळा पैशाची षडयंत्र रचून स्वत:ला फायदा मिळत आहे. याची चौकशी व्हावी ही भूमिका आहे. या बजेट सेशनमध्ये तरी ते बोलतील, अशी बोचरी टीका कपिल सिब्बल यांनी केली.
दरम्यान, अनेक राज्यात फेब्रुवारीत निवडणूक होत आहे. त्याच्या बरोबर आधीच बजेट हेही एक प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सरकार करत. या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे, सिब्बल म्हणालेत.