www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टाच्या आणखी एका रिटायर्ड जजवर एका इंटर्न तरुणीनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. यावेळी आरोपाच्या घेऱ्यात सापडलेत जस्टिस स्वतंत्र कुमार. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असल्याचं सांगण्यात येतंय. ही तरुणी कोलकात्याच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती.
सुप्रीम कोर्टाच्या तपास समितीकडे केलेली तक्रार नामंजूर झाल्यास त्याला ही तरुणी आव्हान देऊ शकते. याआधी जस्टिस गांगुली यांच्यावरही एका तरुणीनं लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळं त्यांना पश्चिम बंगालच्या मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
न्या. गांगुली प्रकरणानंतर आणखी एका प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पीडितेने गेल्याच महिन्यात सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्याकडे तक्रार नोंदवल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.
पीडिता कोलकाताच्या एनयूजेएसची विद्यार्थिनी आहे. तिने शोषणाच्या दोन घटनांचा उल्लेख केला आहे. आरोपी जज सर्वोच्य न्यायालयात कार्यरत असताना पीडिता २०११ मध्ये त्यांच्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी वकील होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.