नवी दिल्ली : संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ फेब्रुवारीला संसदेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन्ही सभागृहांना संबोधीत करणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पानंतर चार दिवसांनी म्हणजेच २९ फेब्रुवारीला आर्थिक पाहणी अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. 


संसदेत अर्थसंकल्पाचे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान असेल तर दुसरे सत्र २५ एप्रिल ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.