'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

सात उपग्रहांची सीरिज असणाऱ्या ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’मधला (ISNSS) तिसऱ्या उपग्रहाचं IRNSS 1C बुधवारी रात्री उशीरा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.

Updated: Oct 16, 2014, 01:21 PM IST
'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण title=

श्रीहरिकोटा : सात उपग्रहांची सीरिज असणाऱ्या ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’मधला (ISNSS) तिसऱ्या उपग्रहाचं IRNSS 1C बुधवारी रात्री उशीरा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.

अमेरिकेच्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टमप्रमाणे प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली स्थापित करण्याच्या उद्देशानं सात उपग्रहांची ही सीरिज भारतानं आखलीय. 

इस्रोच्या ‘पीएसएलव्ही सी२६’नं (भारतीय रॉकेट) श्रीहरिकोटाहून आपल्यासोबत नेव्हिगेशन उपग्रह ‘IRNSS 1C’ ला घेऊन उड्डाण केलंय. ‘IRNSS 1C’चं वजन आहे १,४२५ किलोग्राम... ‘पीएसएलव्ही सी२६’नं नेव्हिगेशन उपग्रह ‘IRNSS 1C’ला त्याच्या ठराविक कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केलंय.  

याअगोदर, याच उपग्रहाला १० ऑक्टोबर रोजी १ वाजून ५६ मिनिटांनी भारतीय रॉकेट पीएसएलव्ही सी२६ च्या २८ व्या उड्डाणामध्ये प्रक्षेपित केलं जाणार होतं. परंतू, तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. 

असणाऱ्या ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’ (ISNSS) सीरिजमधले पहले दोन उपग्रह IRNSS 1A आणि RNSS 1B चं प्रक्षेपण अनुक्रमे १ जुलै २०१३ आणि ४ एप्रिल २०१४ रोजी श्रीहरिकोटाहून करण्यात आलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.