बर्फाखाली जवानाचा मृतदेह, एकाला वाचवण्यात यश

बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह सापडला आहे. जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये हा जवान बेपत्ता झाला होता. अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला हा जवान सापडला. बचाव मोहिमेच्या तिसऱ्यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार यांचा मृतदेह बारा फूट बर्फाखाली सापडला. 

Updated: Mar 20, 2016, 07:40 PM IST
बर्फाखाली जवानाचा मृतदेह, एकाला वाचवण्यात यश

श्रीनगर : बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह सापडला आहे. जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये हा जवान बेपत्ता झाला होता. अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला हा जवान सापडला. बचाव मोहिमेच्या तिसऱ्यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार यांचा मृतदेह बारा फूट बर्फाखाली सापडला. 
     
विजय तामिळनाडूच्या थिरुनवेली जिल्ह्यातील वालारामापूरम गावचे आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. 

कारगिल सेक्टरमध्ये भूकंपाच्या छोटया धक्क्यानंतर झालेल्या हिमस्खलनात दोन जवान बेपत्ता झाले होते. यातील सुजीत या जवानाला वाचवण्यात यश आले. त्याची प्रकृती स्थिर असून, झपाटयाने सुधारणा होत आहे.

विजय कुमार यांचे पार्थिव त्याच्या मूळगावी आणण्यात येणार असून, तेथे त्याच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्याने दिली.