शेतकरी, छोट्या उद्योगांसाठी पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या घोषणा...

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या घोषणांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आणि छोट्या उद्योगधंद्यांसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या... काय आहेत या घोषणा पाहुयात...

Updated: Dec 31, 2016, 09:19 PM IST
शेतकरी, छोट्या उद्योगांसाठी पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या घोषणा...  title=

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या घोषणांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आणि छोट्या उद्योगधंद्यांसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या... काय आहेत या घोषणा पाहुयात...

शेतकऱ्यांसाठी घोषणा...

- शेतकऱ्यांना बियाणे, कर्ज घेण्यात अडचण येऊ नये

- डिस्ट्रीक्ट को ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक आणि प्रायमरी सोसायटीतून ज्या शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलंय त्या कर्जाचं 60 दिवसांचं व्याज सरकार चुकवणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार

- येत्या तीन महिन्यांत 3 करोड शेतकऱ्यांच्या क्रेडिट कार्डांना RUPAY कार्डात बदललं जाईल... यामुळे शेतकऱ्यांना कुठेही आपल्या कार्डाने खरेदी विक्री करता येईल

- सहकारी बँकाना आणखी २० हजार कोटी कमी व्याजाने देईल

- यामुळे नाबार्डला जे आर्थिक नुकसान होईल ते सरकार देणार

लघुउद्योगांसाठी महत्त्वाच्या घोषणा...

- लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी एक कोटीवरून दोन कोटी करणार

- लहान व्यापाऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी भारत सरकार बँकांना गॅरंटी देणार... हे क्रेडिट गॅरंटीने कव्हर होईल

- नॉन बँकिंग फायनान्सनं दिलेले कर्ज कव्हर होईल

- यावरील व्याजदर कमी करण्यात येईल

- छोट्या उद्योगांना कॅश क्रेडिट लिमीट 25 टक्के करणार

- ऑनलाईन वर्किंग लोन 20 टक्क्यांवरून 30 टक्के करणार

- वर्कींग कॅपिटल निश्चित करताना हे लक्षात घ्यावे

- वर्षभरात दोन कोटी कमवणाऱ्यांना कर ६ टक्के मानून केली जाईल

- मुद्रा योजना उत्साहवर्धक ठरली आहे. या योजनेत महिला, दलितांना प्राथमिकता दिली गेली... सरकारपुढे आता लक्ष्य दुप्पट असेल.