नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात सहभागी झालेला चहावाला देखील कॅशलेस झाला आहे. त्यांच्या दुकानावर डेबिट कार्डने देखील पैसे देण्याची सोय केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहा विकणारे किरन महिदा हे तेच आहे जे वडोदरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरतांना त्यांच्या सोबत होते. त्यानंतर ते चर्चेत आले होते.


पंतप्रधान मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेत ते ही सहभागी झाले आहेत. लवकरच ते त्यांच्या दुकानात कार्ड स्वाईप मशीन लावणार आहेत. यांची चहा त्या भागात खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे अनेक ग्राहक त्यांना महिन्याचे एकत्र पैसे देतात.


महिदा यांनी म्हटलं की, मी अनेक दिवसांपासून कॅश पेमेंट घेतो आहे. पण नोटबंदीनंतर मी कार्ड स्वाईप मशीन लावण्याचा प्रयत्न केला. एक जबाबदार नागरिक म्हणून मला हे करणं उचित वाटलं. मागील 5 वर्षापासून मी इनकम टॅक्स भरतो आहे.