नवी दिल्ली :  आपल्या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाऊ शकतं. राजधानी दिल्ली राहणारे हर प्रकाश ऋषी असे एक. ७४ वर्षीय व्यक्तीच्या नावावर २० गिनिज बूक रेकॉर्ड आहेत. 


पत्नीही कमी नाही..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते स्वतःचे गिनिज ऋषी नाव सांगतात. इतकेच नाही तर त्यांची पत्नीही गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर आहेत. या सर्व प्रकारासाठी त्यांची मुलंही त्यांना खूप साथ देतात. 


संपूर्ण शरीरावर आहेत ३६ देशांचे झेंडे 


एकीकडे लोक टॅटू बनविण्याच्या वेदना सहन करू शकत नाही. पण या व्यक्तीला पाहिल्यावर तुम्हांला आश्चर्याचा धक्का बसेल.  ५०० पाईप आणि ५० जळत्या मेणबत्त्या ठेवू शकतील या विक्रमासाठी त्यांनी  आपले संपूर्ण दात काढले आहेत. 


२० गिनिज रेकॉर्ड नावावर...


ऋषी यांच्या नावावर २० गिनिज रेकॉर्ड आहे. पहिले रेकॉर्ड त्यांनी १९९० मध्ये केले होते. त्यांनी दोन मित्रांसह १००१ तास स्कूटर चालवली होती. 


दुसरे रेकॉर्ड -


३९ सेकंदात टॉमॅटो केचअपची बाटली प्यायली होती. नंतर हे रेकॉर्ड एका जर्मन व्यक्तीने ३२ सेकंदात तोडले होते. त्यांच्या नावावर अनेक लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 


पत्नीच्या नावावरही गिनिज रेकॉर्ड


जगातील सर्वात छोटे मृत्यूपत्र लिहिण्याचा विक्रम ऋषी यांच्या नावावर आहे.   All to Son. असं मृत्यूपत्र लिहिलं आहे.