नवी दिल्ली : देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळं वातावरण दिसतंय. कुठे थंडी तर कुठे पाऊस अशी सध्याची परिस्थिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीत चक्क पाऊस कोसळतोय. तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये हिमवादळाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. हिमाचलप्रदेश, कुलू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरूय. 


या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काही रस्तेही बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आलेयत. तर इकडे राज्यातही थंडीचा कडाका वाढतोच आहे. काही ठिकाणी पारा 7 अंशाच्याही खाली आलाय. 


नाशिकमध्ये पारा 7.3 अंशावर आलाय. निफाडचं तापमान 5 अंशावर आलंय. तर अहमदनगर आणि जळगावमध्ये मध्ये पारा 8 अँशावर स्थिरावलाय़. तर ्कोल्यातला पारा 11.8 अंशांवर स्थिरावलाय. त्यामुळं स्वेटर, शाल, मफलरसह शेकोटीचाही लोक आधार घेताना दिसतायत. सकाळच्या वेळी फिरायला निघणारे लोक ठिकठिकाणी वाफाळत्या चहाचा आधार घेतायत.