नवी दिल्ली : देवयानी खोब्रागडे यांना स्वीय सहाय्यकपदी नियुक्त करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी सरकारनं फेटाळली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनीच खोब्रागडेंचं नाव नाकरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


देवयानी खोब्रागडे या रिपाईंचे सरचिटणीस आणि माजी आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडेंच्या कन्या आहेत. 1999 मध्ये त्या भारतीय परराष्ट्र खात्यात रुजू झाल्या. त्यानंतर अमेरिकेत उपकाऊन्सिल जनरलपदावर काम करताना खोब्रागडेंनी मोलकरणीच्या व्हिसासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप ठेवण्यात आला.  त्यांना अमेरिकेत अटकही करण्यात आली. या घटनेनंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं.