भारत सरकारचा सॅमसंगला दे धक्का

भारत सरकारने विमान प्रवासात सॅमसंग गॅलक्सी नोट-7च्या वापरावर बंदी आणली आहे.

Updated: Sep 12, 2016, 11:40 AM IST
भारत सरकारचा सॅमसंगला दे धक्का title=

नवी दिल्ली : भारत सरकारने विमान प्रवासात सॅमसंग गॅलक्सी नोट-7च्या वापरावर बंदी आणली आहे.

हा स्मार्टफोन कंपनी सॅमसंगला एक मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे, कारण नुकताच लाँच झालेल्या स्मार्टफोन गॅलक्सी नोट-7ला नागरी उड्डयन मंत्रालयानं विमान प्रवासात बंदी घातली आहे.

 सॅमसंग गॅलक्सी नोट-7 बॅटरीचा स्फोट झाल्याची बातमी होती, यावरून सॅमसंगनं या स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे, तसेच याआधी विक्री करण्यात आलेले स्मार्टफोन परत मागवून घेतले आहेत.

 या प्रकारानंतर अमेरिका फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननं विमान प्रवासात या फोनच्या वापरावप बंदी घातली. त्यानंतर भारत सरकारनंही कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी असा निर्णय घेतला आहे.

विमान प्रवास करताना  नोट-7 हा फोन वापरु नये किंवा चार्जिंगही करु नये, असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.