श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीवेळी हिंसाचार, सहा जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान झालं.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान झालं. यावेळी बडगाव जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर हिंसाचार झाला. मतदान केंद्रावर हल्ला करणा-या गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात सहा जणांचा मृत्यू झाला.
या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मेहबुबा सरकारवर जोरदार टीका केलीय. याला राज्य, केंद्र आणि निवडणूक आयोगही जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, देशातल्या आठ राज्यांमध्ये १० विधानसभा मतदारसंघांमध्येही मतदान झालं. त्यात दिल्लीच्या राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.