नवी दिल्ली : निवडणुकींमधल्या पराभवानंतर काँग्रेसच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झाली आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी या उपचारांसाठी आजा परदेशामध्ये जाणर आहेत. सोनिया गांधींबरोबर राहुल गांधीही असतील अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी आजारी आहेत. यामुळेच त्या नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारामध्येही मैदानात उतरल्या नाहीत. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वाराणसीत प्रचारादरम्यान सोनियांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर दोन महिने उपचार सुरु होते. हिवाळी अधिवेशन आणि काँग्रेसच्या बैठकीतही सोनिया गांधी सहभागी झाल्या नव्हत्या.