यूपी, बिहारी परदेशात झाडू मारतात : राज्यपाल नाईक

उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक परदेशात झाडू मारण्याचे काम करतात, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बोलताना केले.

Updated: Nov 27, 2015, 07:27 PM IST
यूपी, बिहारी परदेशात झाडू मारतात : राज्यपाल नाईक title=

वाराणसी : उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक परदेशात झाडू मारण्याचे काम करतात, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बोलताना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत विद्यार्थ्यांना बुद्धी आणि श्रमाचे मोल समजावून सांगताना राम नाईक यांनी हे वादग्रस्त विधाना केले आहे. बुद्धीच्या जोरावर भारतीयांनी जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांमध्ये मजल मारली आहे, असे ते यावेळी म्हणालेत.

परदेशातील अनेक रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर्स आणि परिचारिकांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. यात केरळ या राज्यातील लोकांचा विशेष भरणा आहे. पण त्याच रुग्णालयांमध्ये झाडू आणि साफसफाई करणार्‍यांत यूपी-बिहारचे लोक अधिक आहेत, असे नाईक यांनी नमुद केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.