मुलायम मोदींच्या कानात काय बोलले?

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात मुलायम सिंग यादव काय बोलले याविषयीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Updated: Mar 21, 2017, 06:19 PM IST
मुलायम मोदींच्या कानात काय बोलले?  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात मुलायम सिंग यादव काय बोलले याविषयीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. थोडा अखिलेश का खयाल रखीये, इनको सिखाईये असं मुलायम मोदींना बोलल्याचं वृत्त टेलिग्राफ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.

या शपथविधी सोहळ्यावेळी मुलायम आणि नरेंद्र मोदींच्या जवळ उभ्या असलेल्या भाजपच्या नेत्यानं ही माहिती दिल्याचं टेलिग्राफच्या या बातमीत सांगण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये ३२५ जागा जिंकत भाजपनं दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर योगी आदित्यनाथ यांनी रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

पाहा काय झालं होतं शपथविधीवेळी