सीमा ओलांडल्याने पाकमध्ये माकडाला अटक

एका माकडाला भारताची सीमा ओलांडल्यानंतर अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. बहावलपूरच्या वनाधिकाऱ्यांनी या माकडला पकडल्याचं वृत्त एक्सप्रेस न्यूज चॅनलने दिलं आहे. बहावलपूर जिल्ह्यातील चोलिस्तान भागातल्या स्थानिकांनी सुरवातीला माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण या माकडाने त्यांना गुंगारा दिल्यानंतर लोकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवलं.

Updated: Dec 5, 2011, 05:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

एका माकडाला भारताची सीमा ओलांडल्यानंतर अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. बहावलपूरच्या वनाधिकाऱ्यांनी या माकडला पकडल्याचं वृत्त एक्सप्रेस न्यूज चॅनलने दिलं आहे. बहावलपूर जिल्ह्यातील चोलिस्तान भागातल्या स्थानिकांनी सुरवातीला माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण या माकडाने त्यांना गुंगारा दिल्यानंतर लोकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवलं. वनाधिकाऱ्यांनी बरीच धावपळ करुन या माकडाला पकडलं आणि त्यानंतर त्याला बहावलपूरच्या प्राणी संग्रहालयात नेण्यात आलं. आता या माकडाचे बारसं करण्यात आलं आहे आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे बॉबी.

 

भारतीय पोलिसांनी मागच्या वर्षी मे महिन्यात एका कबुतराला पकडलं होतं आणि पाकचा गुप्त संदेश पोहचवण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत होता.  पंजाबमध्ये पाक सीमेलगत या कबुतराला पकडण्यात आल्यानंतर अमृतसर जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये सशस्त्र पहारेकऱ्याच्या देखरेखी खाली या कबुतराला ठेवण्यात आलं होत.

 

Tags: