लिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर
ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.
लंडन : ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.
एका महिलेला एका अनोळखी माणसाने लिंगाचा फोटो पाठवला, यानंतर महिलेने अशी काही चपराक लगावली की ते उत्तर सोशल मीडियावर ट्रेंड करतंय.
लोकांकडून या महिलेला तिच्या धैर्याबद्दल आणि घाणेरडापणा करणाऱ्या लोकांना चाप लावल्याबद्दल तिचं अभिनंदन करीत आहेत.
नेमकं काय झालं?
ब्रिटनमधील समांता नावाच्या महिलेने मॅनचेस्टरच्या एका रेस्टॉरंटचा रिव्यूव फेसबुकवर लिहिला.
या नंतर एका अनोळखी माणसाने लिहिलं, 'तुझा इनबॉक्स चेक कर'
समांताने इनबॉक्स चेक केला, तर यात जेम्स नावाच्या माणसाने लिंगाचा फोटो पाठवला होता.
सुरूवातीला दुर्लक्ष करावंस वाटलं पण....
समांताने बीबीसी ट्रेडिंगला सांगितलं, पहिल्यांदा मला याकडे दुर्लक्ष करावसं वाटलं, जसं नेहमी महिलांना शिकवलं जातं.
पण एक क्षण मी विचार बदलला, आणि यांला धडा शिकवायलाच हवा असं ठरवलं.
समांताने या व्यक्तीला उत्तर म्हणून लिंगाचे अनेक फोटो पाठवण्यास सुरूवात केली. यात लिंगाचे अनेक कार्टुनसारखे फोटो होते.
लिंगाचा फोटो पाठवणारा गयावया करू लागला...
समांताने पाठवलेल्या फोटोंचा दणका जेन्सला असा काही बसला की तोच म्हणायला लागला, 'आता तरी बस कर, मला उल्टी होईल असं वाटतंय'.
समांताला त्याने आणखी एक विनंती केली, 'मी जे मेसेज पाठवले ते कृपया सार्वजनिक करू नको'.
संपूर्ण प्रकरण फेसबुकवर
बीबीसी टेंड्रिंगशी बोलताना समांताने सांगितलं, मी सर्व मुलांना सांगू इच्छीते, प्रत्येक मुलगी तुमच्या अशा छेडण्यावर शांत बसून राहणार नाही. यापुढे तुम्हाला सर्वांसमोर उघड करण्यात येईल, समांताने हे संपूर्ण प्रकरण फेसबुकवर पोस्ट केलं आहे, लोकांनी हे जोरदार शेअर केलंय.