नवी दिल्ली : भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ एकटे पडले आहेत. शरीफ यांनी त्यांच्या देशातल्या राजकारण्यांना केलेलं एकत्र येण्याचं आवाहन इम्रान खाननं धुडकावून लावलं आहे. 


सर्वांनी एकत्र येऊन संसदेत या हल्ल्याचा निषेध करावा असं आवाहन नवाज शरीफ यांनी केलंय. त्यासाठी संसदेचं विशेष संयुक्त अधिवेशनही बोलवण्यात आलंय. पण इमरान खानच्या तहरीक ए इन्साफ या पक्षानं संसदेच्या अधिवेशनावर बहिष्कार घातलाय. अशा परिस्थितीत अधिवेशऩाला जाणं म्हणजे नवाज शरीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्यासारखं होईल आणि ते आम्हाला करायचं नाही, असं इमरान खानंचं म्हणणं आहे.