उत्तर कोरिया अमेरिकेला `अण्वस्र हल्ल्याचं` प्रत्यूत्तर द्यायला सज्ज
उत्तर कोरियानं अमेरिकेला युद्धासंबंधी चेतावणी दिलीय. अमेरिकेनं आपल्या क्षेत्रात प्रक्षोभक कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा आपण अण्वस्र हल्ल्यांचं प्रत्यूत्तर द्यायला सज्ज आहोत, असा दमच उत्तर कोरियानं अमेरिकेला भरलाय.
प्योंगयांग : उत्तर कोरियानं अमेरिकेला युद्धासंबंधी चेतावणी दिलीय. अमेरिकेनं आपल्या क्षेत्रात प्रक्षोभक कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा आपण अण्वस्र हल्ल्यांचं प्रत्यूत्तर द्यायला सज्ज आहोत, असा दमच उत्तर कोरियानं अमेरिकेला भरलाय.
१५ एप्रिल रोजी उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांचा १६५ वा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला... यावेळी, उत्तर कोरियानं आपल्या सेन्याच्या ताकदीचं जोरदार प्रदर्शनही केलं. परेडमध्ये नव्या आंतरखंड आणि पानबुडीतून लॉन्च केल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल्सचंही प्रदर्शन करण्यात आलं. उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उननं परेडची सलामी घेतली.
उल्लेखनीय म्हणजे, जगाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या उत्तर कोरियानं यावेळी मात्र परदेशी मीडियालाही या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी पाचारण केलं होतं.