इस्लामाबाद :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज पुन्हा उघडपणे सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा नकार दिला. भारताकडून गोळीबार झाल्याचे त्यांनी मान्य केले, यात दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेले, पण सर्जिकल स्ट्राइक झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाज म्हणाले आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत. आम्हांला शांती पाहिजे आहे. आम्ही दहशतवादाविरोधात आहोत. पण आमच्या देशाविरोधात कोणी हल्ला करत असेल तर योग्य ती पाऊले उचलण्यासाठी सक्षम आहोत. 


चोराच्या उलट्या बोंबा...


नवाज शरीफ यांनी आज पाकिस्तानच्या संयुक्त सत्रात बोलत होते.  नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्यावर हल्ला करत म्हणाले की, मोदी गरीबी दूर करण्याबद्दल बोलतात, पण बॉम्ब आणि दारूगोळ्याच्या शेतीने गरिबी नाही कमी होणार तसेच रणगाडे चालवून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकत नाही. 


काश्मीरचा राग पुन्हा आळवला...


काश्मीरच्या मुद्यावर नवाज शरीफ म्हणाले, जोपर्यंत काश्मिरचा मुद्दा सोडवला नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही.