मुंबई :  आज आम्ही तुम्हांला दहा अशा देशांची यादी देणार आहोत त्यात बलात्काराच्या घटना सर्वाधिक होतात. तुम्हांला धक्का बसेल की अमेरिका, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे.


१०. इथोपिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथोपियामध्ये जवळपास ६० टक्के महिला या लैंगिक छळाला बळी पडतात.  बलात्कार ही इथोपियाचा सर्वात मोठी समस्या आहे. 


९. श्रीलंका


श्रीलंकेत १४.५ टक्के पुरूष आपल्या जीवनात कधी ना कधी बलात्काराच्या गुन्हात अडकलेले दिसतात. एकूण लोकसंख्येच्या ४.९ टक्के बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. 
त्यातील २.७ टक्के पुरूषांनी पुरूषांवर बलात्कार केला आहे. १.६ टक्के गँग रेप झाले आहेत. ९६.५ टक्के बलात्कार करणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. 


८. कॅनडा


 कॅनडात एकूण २५ लाख १६ हजार ९१८ बलात्काराच्या केसेस नोंदविण्यात आल्या आहे. कॅनडातील ३ पैकी एका महिलेवर बलात्कार झाला आहे. यातील फक्त ६ टक्के तक्रार पोलिसांमध्ये नोंदविल्या गेल्या आहे. 


७.फ्रान्स


फ्रान्समध्ये १९८० पर्यंत बलात्कार हा गुन्हा मानण्यात येत नव्हता. फ्रान्समध्ये दरवर्षी सुमारे ७५ हजार बलात्कार होतात. यातील १० टक्के जण तक्रार नोंदवितात. 


६.जर्मनी


जर्मनीमध्ये आतापर्यंत २ लाख ४० हजार महिला या बलात्कारात ठार झाल्या आहेत. जर्मनी हा जगातील सहावा देश आहे ज्यात सर्वाधिक बलात्कार केले जातात. यावर्षी एकूण ६५ लाख ०७ हजार ३९४ बलात्कार झालेत. 


५. ब्रिटन 


ब्रिटन हा विकसीत देश म्हणून पाहायला येतात. पण बलात्काराच्या बाबतीत हा देश भयावह आहे. यात इंग्लड आणि वेल्स या भागात दरवर्षी सरासरी ८५ हजार बलात्कार होतात. तर ४ लाख महिलांवर दरवर्षी लैंगिक अत्याचार केले जातात. 


४. भारत


भारतात बलात्कार ही खूप मोठी समस्या झाली आहे. २०१२ मध्ये बलात्काराच्या २४ हजार ९२३ केसेस दाखल करण्यात आल्या. पण ही संख्या न नोंदविल्यापेक्षा खूप कमी आहे. यातील २४ हजार ४७० केस या पालकांनी, नातेवाईकांनी, शेजारच्यांनी केलल्या आहेत. रिपोर्टनुसार दर २२ मिनिटांनंतर भारतात एक बलात्कार होतो. 


३. स्वीडन


युरोपात बलात्कार होणाऱ्या देशांमध्ये स्वीडनचा क्रमांक सर्वात पुढे लागतो. तसेच स्वीडनचा जगात रेप क्राईमच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. 


२. दक्षिण आफ्रिका 


बलात्काराच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. २०१२ मधील आकडेवारीननुसार ६५ हजार बलात्काराच्या प्रकरणांची नोंद आहे. याला रेप कॅपिटल म्हटले जाते. दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांवर बलात्कार होण्याचे प्रमाण अधिक आहे. बलात्काऱ्याला शिक्षा झाली तर ती केवळ २ वर्ष आहे. 


१. अमेरिका 


अमेरिका ही बलात्काराच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. बलात्कार करणारे ९९ टक्के पुरूष असून त्यात पीडित या ९१ टक्के महिला आहेत तर पुरूष पीडितांचे प्रमाणे ९ टक्के आहे. अमेरिकेतील ६ पैकी एका महिलेवर बलात्कार झाला आहे. तर ३३ पैकी १ पुरूषांवर बलात्काराची घटना घडली आहे. वयाच्या १४ व्या वर्षी बलात्कार झाल्याचे बहुतांशी बलात्कार पीडित महिलांचे अनुभव आहेत. अमेरिकेत बाहेर बलात्कार होत नसून बहुतांशी घरातच केले जातात.