नवी दिल्ली : कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विजय माल्ल्या लवकरच भारताच्या ताब्यात मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय टीम लंडनमध्ये जाणार आहे. माल्ल्याने कित्तेक कोटी रुपयांना बॅंकाना फसविले होते. कर्ज घेऊन ते न फेडता लंडनमध्ये आसरा घेतला होता.


देशातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला लंडनमध्ये स्कॉटलँड पोलिसांनी अटक केली आहे. माल्ल्याला लवकरच लंडन येथील कोर्टासमोर हजर केले जाईल असे सूत्रांनी सांगितले.