मुंबई: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचं ब्रेक अप होऊन आता जवळपास 1 महिना झाला आहे. ब्रेक अपनंतर विराट कोहलीनं आईसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर स्त्री असं या ट्विटमध्ये त्यानं म्हंटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अनुष्का शर्मानंही आता असाच एक फोटो शेअर केला आहे. आपल्या कुत्र्याला फिरवत असतानाचा तिचा हा फोटो आहे. शूटिंगमधून वेळ काढून 'ड्यूड'सोबत वेळ घालवत आहे. छोट्या गोष्टी एन्जॉय करणं हेच आयुष्य आहे, असं अनुष्का या फोटोबाबत म्हणतेय.