अरुण गवळीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आणखी एक चित्रपट येणार आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा एक फोटो सध्या लीक झाला आहे. 

Updated: Jun 13, 2016, 11:58 PM IST
अरुण गवळीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट title=

मुंबई : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आणखी एक चित्रपट येणार आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा एक फोटो सध्या लीक झाला आहे. 

या फोटोमध्ये अर्जुन रामपाल अरुण गवळीच्या वेशभुषेमध्ये दिसत आहे. दक्षीण मुंबईमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रानं अरुण गवळीच्या लूकमधला हा फोटो प्रसिद्ध केला आहे. 

डॅडी या चित्रपटाचं बहुतेक शूटिंग या महिन्याभरामध्ये पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दक्षिणेतील अभिनेत्री ऐश्वर्या राजेश ही या चित्रपटामध्ये अरुण गवळीच्या बायकोची भूमिका करत आहे.