Review : निर्मिती सावंतची दंबगगिरी 'बाय गो बाय'

 विजय पगारे दिग्दर्शित निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेला 'बाय गो बाय' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. 'बाय गो बाय' ही गोष्ट आहे बायजाक्काची. 

Updated: Dec 4, 2015, 08:27 PM IST
Review : निर्मिती सावंतची दंबगगिरी 'बाय गो बाय'  title=

मुंबई : विजय पगारे दिग्दर्शित निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेला 'बाय गो बाय' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. 'बाय गो बाय' ही गोष्ट आहे बायजाक्काची. 

सिनेमाची कथा 
नायकांची वाडी नावाचं एक गाव असतं या गावात बायजाक्का या महिलेचं राज्य चालतं. इतकं की गावातील महिलांच्या हातीच सर्व अधिकार असतात.

पुरुषांनी घर काम करायचं, मिषा सु्द्धा वाढवायच्या नाही, असा नियमही बायजाक्का या गावात लागू करते. पण बायजाक्का असं का करते. त्यामागे काय कारण असतं. पुरुषांसाठी बायजाक्काचा मनात इतका द्वेश का असतो. या सगळ्या गोष्टी मी आता रिवील करु शकत नाही त्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

सिनेमाची हाताळणी
सिनेमाची कथा चांगली आहे. दिग्दर्शक विजय पगारेचा हा पहिला सिनेमा असला तरी त्यांनी 'बाय गो बाय' या सिनेमाची हाताळणीही बरी केली आहे, असं म्हणता येइल. ग्रामीण पद्धतीचा कॉमेडी आणि ड्रामा या अशा जॉनरचा हा सिनेमा असल्यामुळे कुठेतरी सिनेमात नाविन्य असं फार दिसत नाही. त्याच त्याच गोष्टी या सिनेमातही पाहायला मिळतात.

अभिनेत्री निर्मिती सावंत त्याच्या भूमिकेत परफेक्ट वाटतात. त्याचबरेबर अभिनेता विजय पाटकर, नयन जाधव, शीतल फाटक या नटांनी आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत.

किती स्टार्स
बाय गो बाय या सिनेमाला २.५ स्टार्स.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.