कंदीलच्या हत्येनंतर फेसबुकवरून तिच्या आठवणीही झाल्या `डिलीट`!
`ऑनर किलिंग`ला बळी पडलेली पाकिस्तानी मॉडल कंदील बलोच हिच्या फॅन्ससाठी एक निराशादायक बातमी आहे.
इस्लामाबाद : 'ऑनर किलिंग'ला बळी पडलेली पाकिस्तानी मॉडल कंदील बलोच हिच्या फॅन्ससाठी एक निराशादायक बातमी आहे.
२६ वर्षांच्या कंदीलची तिच्या भावानंच खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या केली. त्यानंतर आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून अकाऊंट डिलीट करण्यात आलंय.
पाकिस्तानी सरकारनं कंदीलचं फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर हे अकाऊंट फेसबुकनं डीलिट केलंय. दरम्यान, कंदीलचं ट्विटर अकाऊंट मात्र अद्यापही सुरू आहे.
फेसबुकच्या नियमानुसार, एखाद्या मृत व्यक्तीचं अकाऊंट इतरांसाठी आठवणी म्हणून राहतं... इथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मित्र त्याच्या आठवणी शेअर करू शकतात. फेसबुक हेल्प सेंटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वैध मागणीनंतर त्याचं अकाऊंट फेसबुकवरून हटवलं जातं.