प्रेम रतन धन पायो : पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या 'प्रेम रतन धन पायो' याला बॉक्स ऑफीसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. साधारण ७० ते ८० टक्के थिएटर भरले होते. 

Updated: Nov 12, 2015, 08:55 PM IST
प्रेम रतन धन पायो :  पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या 'प्रेम रतन धन पायो' याला बॉक्स ऑफीसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. साधारण ७० ते ८० टक्के थिएटर भरले होते. 

१६ वर्षांनंतर पुन्हा एकदा सलमान खान आणि सूरज बडजात्या एकत्र येऊन 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट केला आहे.

या चित्रपटाने एक चांगली आणि दमदार ओपनिंग मिळवली आहे. सुमारे ३५ ते ४० कोटींचा गल्ला पहिल्याच दिवशी 'प्रेम रतन धन पायो'ने केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच आठवड्याच्या अखेरीपर्यंत हा चित्रपट ११० ते १२० कोटींचा गल्ला कमविण्याची शक्यता आहे. देशभरातील साधारण ७० ते ८० टक्के मल्टीप्लेक्समध्ये दाखविण्यात येत. पुन्हा एकदा सलमान आणि सूरज बडजात्या हे कॉम्बिनेशन पुन्हा क्लिक झाले असल्याचे वितरक गिरीश वानखेडे यांनी सांगितले. 

यापूर्वी सलमानच्या बजरंगी भाईजानने पहिल्या दिवशी २७.२५ कोटींची कमाई केली होती. आता 'प्रेम रतन धन पायो' हा त्याच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी हॅपी न्यू इअरने दिवाळीत ४४.९७ कोटी रूपयांची ओपनिंग दिली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.