close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सैराटची कमाई ७० कोटींच्या घरात

नागराज मंजुळेचं दिग्दर्शन असलेल्या सैराट या सिनेमाची कमाई 70 कोटींच्या घरात गेली आहे.

Updated: May 22, 2016, 09:17 AM IST
सैराटची कमाई ७० कोटींच्या घरात

मुंबई : नागराज मंजुळेचं दिग्दर्शन असलेल्या सैराट या सिनेमाची कमाई 70 कोटींच्या घरात गेली आहे.

हा सिनेमा दुबईमध्येही प्रदर्शित करण्यात आला असून सिनेमाला तिकडेही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आर्ची आणि परश्या यांच्या लव्हस्टोरीला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. 

चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासून या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळतेय. तसेच बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रमही या चित्रपटाने तोडले. 

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणारा हा सैराट 100 कोटींच्या क्लबमध्ये जाणार का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.