मुंबई : महिला सशक्तीकरणासाठी दीपिका पदुकोणने तयार केलेल्या व्हिडीओ अनेकांना आवडला असला, तरी अनेकांनी या व्हिडीओतील काही मुद्यावर आपला आक्षेप नोंदवला आहे. दीपिकाने सांगितलेल्या 'सेक्स आऊट साईड ऑफ मॅरेज'च्या मुद्वर सोशल नेटवर्किंगवर चर्चेला ऊत आला आहे. या व्हिडीओला लाईक्स आणि डिसलाईक्स देखिल आहेत. या व्हिडीओखाली साडेतीन हजाराच्यावर प्रतिक्रिया आहेत.
अनेकांनी दीपिकाचा व्हिडीओ हा चांगला असल्याचं म्हटलं आहे. मात्र 'सेक्स आऊट ऑफ मॅरेज' या मुद्यावर अनेकांनी दीपिकाला सवाल केले आहेत. 'सेक्स आऊट साईड ऑफ मॅरेज' आणि महिला सशक्तीकरणाचा काय संबंध?, असा सवाल देखिल नेटीझन्स करतायत. हा मुद्दा अनेकांना आवडलेला दिसत नाही.
'सेक्स आऊट ऑफ मॅरेज' हा स्वातंत्र्य की स्वैराचार हा सवाल देखिल या ठिकाणी उपस्थित होतोय. "शारिरिक संबंधांचं स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण नाही" अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.