मुंबई : सनी लियॉन नावाचं वादळ बॉलिवूडमध्ये सध्या फोफावत चाललंय. एकापाठोपाठ एक अशा हिट सिनेमांची रांगच सनीने लावलीये. एकीकडे सनी लियॉनच्या नावाने बोटं मोडणा-यांची संख्या वाढत असतानाच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनीच्या एक पहेली लीला सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
सनीला राजस्थानी वेषात पडद्यावर झळकावणा-या लीलाने पहिल्याच दिवशी ५ कोटी ३० लाखांचा गल्ला जमवला तर आतापर्यंत या सिनेमाची कमाई २२ कोटींची झालीये. १५ कोटींचे बजेट असलेला या सिनेमाची ही कमाई खरोखरच तोंडात बोट घालायला लावणारीच आहे.
एक पहेली लीलावर समीक्षकांनी स़डकून टीका केलीय..तर दुसरीकडे शमिताभ, एनएच 10, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी यांना प्रेक्षक आणि समीक्षकांनीही गौरवल आहे..मात्र पहिल्या दिवसाच्या कमाईत लीलाने या सगळ्यांनाच धोबीपछाड दिलीये.
शमिताभ - पहिल्या दिवशी 3.50 कोटी
एनएच 10 - पहिल्या दिवशी 3.35 कोटी
डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी - पहिल्या दिवशी 4.41 कोटी
या तिन्ही सिनेमांच्या तुलनेत सनीच्या सिनेमाची कामगिरी खरच जादूई म्हणावी लागेल. सनी लियॉनने अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मासारख्या बड्या स्टार्सनाही मागे टाकलय. शमिताभमध्ये बिगबींची जादू चालू नाही शकली...तर एनएच १०मधील अनुष्काच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले परंतू तिकिटबारीवर सिनेमाला हवा तसा गल्ला कमाविता आला नाही. त्यामुळे नक्कीच सनीच्या सिनेमाला मिळालेलं यश मोठ म्हणाव लागेल.
आता पुन्हा सनीचा कुछ कुछ लोचा है हा सेक्स कॉमेडी सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असून या सिनेमातही सनीचा बिंधास्त अंदाज बघायला मिळणार आहे. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर हिट होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय..त्यामुळे एकीकडे सनी लियॉनच्या सिनेमांना उघडपणे नाव ठेवणारे प्रेक्षक तिच्या सिनेमाला गर्दीही करतात. प्रेक्षकांची ही भूमिका खरच दुटप्पी आहे का असाही प्रश्न अनेक जाणकारांनी उपस्थित केलाय..काहीही असो मात्र सनी नावाच्या नाण्याचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे असंच सध्या म्हणाव लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.