महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हटलं की पहिलं नाव नजरेसमोर येतं ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांचं... हाच आवाज 'बाळकडू' या सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमणार आहे...
मुंबई : महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हटलं की पहिलं नाव नजरेसमोर येतं ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांचं... हाच आवाज 'बाळकडू' या सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमणार आहे...
अभिनेता उमेश कामत हा एका मराठी मध्यमवर्गीय मुलाच्या मुख्य भूमिकेतून या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय... सोबतच, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जयवंत वाडकर, हृदयनाथ राणे आणि रमेश वाणी हेदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हाताला बळकटी देणारे आणि मराठी बाणा जोपासणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित ‘बाळकडू’ हा चित्रपट तयार झाल्याचं सांगण्यात येतंय. चित्रपटाचं वैशिष्ट्यं म्हणजे, यात बाळासाहेबांचा आवाजदेखील प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहे... ट्रेलरमध्येही हा आवाज आपलं लक्ष वेधून घेतोय.
दिग्दर्शक अतुल काळे, सह-दिग्दर्शक आशिष रायकर आणि अमोल घरत यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सिनेमा तयार केलाय. या चित्रपटाची निर्मिती केलीय स्वप्ना पाटकर यांनी...
येत्या, २३ जानेवारीला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.