चंदीगड : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शूटिंगमधून मिळालेल्या वेळात मौज मजा करताना दिसत आहेत. सल्लू आणि अनुष्काने शेतात जाऊन टॉमेटो खाल्ले तर दाताने ऊस सोलला.


'सुल्तान' सिनेमाच्या मुख्य भूमिकेत दोघेही आहेत. या सिनेमाचे शूटिंग पंजाबमध्ये सुरु आहे. निर्देशक अली अब्बास जफर याने दोघांचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात सलमान टॉमेटो तोडताना दिसत आहे तर अनुष्का ऊस चुपताना दिसत आहे.