आता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया

झरिन खान सुझान खानच्या आईनं आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय. 

Updated: Sep 16, 2015, 04:22 PM IST
आता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया title=

मुंबई: झरिन खान सुझान खानच्या आईनं आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय. 

पिंकविला.कॉम नावाच्या वेबसाइटला झरिननं दिलेल्या इंटरव्ह्यू म्हटलंय, सुझानच्या आयुष्यात दुसरा कोणताही पुरूष नाही. ती तिच्या मुलांसोबत आनंदी आहे. ती दुसरं लग्न करणार नाहीय. 

आणखी वाचा - Gossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न

 

बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या या अफवांमुळे मला धक्का बसला असंही झरिन खान यांनी सांगितलंय. १७ वर्षांच्या नात्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि सुझाननं घटस्फोट घेतला होता. त्यांना रिहान आणि रिधान नावाचे दोन मुलं आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.