`माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा`
राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.
औरंगाबाद: राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत. त्यासाठी 10 मे पर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हाप्रशासनाला मुदत देण्यात आलीय.
कोपरगावच्या संजय काळे यांनी केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठांनं दिलाय. सरकारनं सुनावणी दरम्यान पुढच्या चाळीस दिवसात तीन टप्प्यात 45 टक्के पाणी कपात करण्याची तयारी दाखवली होती.
पण दररोज पाण्याविना माणसं आणि पशूपक्षी मरत असताना शासनानं महसूलाचा विचार करू नये, असं खंडापीठानं म्हटलंय. सध्या मद्य निर्मिती उद्योगांवर 30 टक्के पाणी कपात करण्यात आल्याचंही जिल्हाप्रशासनानं कोर्टाला सांगितलंय.