बारामती :   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरातबाजीवरून भाजपवर टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक सोशल मीडियावर कसाही प्रचार करून निवडून येतात. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे इतके नगरसेवक पाहून भाजपलाही धक्का बसला असेल, असा टोमणा अजित पवारांनी मारला. 


बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडून आलेल्यांचा सत्कार करताना अजित पवार बोलत होते. 


जाहीरातबाजीची कला शिकून घेण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देताना, खोटी जाहीरातबाजी फार काळ टिकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.