पानसरेंच्या प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि राष्ट्रवादीत...
निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांचं पक्षांतर नवं नाही....पिंपरी चिंचवड ही त्याला अपवाद नाही...! राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळंही पिंपरी चिंचवड च्या राजकारणात अनेक परिणाम होण्याची चिन्ह आहेत...!
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांचं पक्षांतर नवं नाही....पिंपरी चिंचवड ही त्याला अपवाद नाही...! राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळंही पिंपरी चिंचवड च्या राजकारणात अनेक परिणाम होण्याची चिन्ह आहेत...!
आझम पानसरे यांच्या प्रवेशान भाजप ची ताकत वाढलीय खरी, पण त्यांच्या प्रवेशामुळं भाजप मध्ये अंतर्गत संघर्षाचा पुढचा अध्याय सुरु झालाय...! आझम पानसरे यांनी विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना मदत केली होती. लांडगे यांच्या विजयात आझम पानसरे यांचा मोलाचा वाट होता.. म्हणूनच महेश लांडगे यांनी शिष्टाई करत आझम पानसरे याना भाजप मध्ये आणण्यात यशस्वी डावपेच टाकले आणि पानसरे भाजप वासीय झाले..
महेश लांडगे यांनी पानसरे यांना गुरुदक्षिणा दिली असंही बोललं जाऊ लागलंय.. महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशाने शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यात धुसपूस सुरूच झाली होती. आता आझम पानसरे यांच्या प्रवेशाने लांडगे यांची ताकत वाढलीय आणि सर्वात पहिल्यांदा भाजप मध्ये गेलेल्या लक्ष्मण जगताप यांना भाजप मध्येच आव्हाण निर्माण झालंय...!
भाजप मध्ये तिकीट वाटप करताना आता जगताप यांचा एकछत्री अंमल राहणार नाही उलट लांडगे आणि पानसरे यांच्या मतांना ही किंमत द्यावी लागणार आहे...! त्यामुळं तिकीट वाटपा पासूनच संघर्ष अटळ आहे...
महेश लांडगे यांनी तर भाजप च्या सर्व नेत्यांपुढ आझम पानसरे यांना गुरु सांगत सूचक संदेश दिलाय...! तर दुसरीकडं लक्ष्मण जगताप यांनी पानसरे यांचा प्रवेश गुरुदक्षिणा नाही तर लांडगे यांचे कट्टर विरोधक विलास लांडे यांचा भाजप प्रवेश खरी गुरुदक्षिणा ठरेल असा टोला लगावलाय...!
एकीकडं भाजप मध्ये नेत्यांची संख्या वाढत असताना राष्ट्रवादी मध्ये आता केवळ विलास लांडे हे एकमेव स्थानिक तगडे नेते राहिले आहेत... आता पर्यंत त्यांना पक्षात अनेक विरोधक होते...आता ते एकटेच आहेत. त्याचमूळ त्यांना नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळलीय...
पिंपरी चिंचवड चे शरद पवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांडे यांना आता पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या नंतरचा दुसरा नेता होण्याची संधी मिळालीय. स्थानिक नेतेच नसल्याने अजित पवार यांच्या साथीन तिकीट वाटपापासून सर्वच बाबतीत त्यांना मोकळीक असणारेय....
सध्या राजकीय ताकत कमी झालेल्या लांडेंना म्हणूनच आपलं कसब पणाला लाऊन पुन्हा भरारी घेता येणार आहे...! त्यामुळं अंतर्गत संघर्षात अडकलेली भाजप आणि काही मोजक्या खांबावर राष्ट्रवादीत कोण बाजी मारणार हे कळण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल...!