कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे हायकोर्टानं मनपाला फटकारलं आहे. नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी आणू असा सज्जड दम भरल्याने महापालिका प्रशासन आणि बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी कोर्टाला विचार करण्याची विनंती केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिकांनी सुद्धा या बाबतीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आयुक्तांनी  याबाबत दिलेल्या आश्वासनानंतर सुद्धा जर हायकोर्टाचे समाधान होत नसेल तर अशी महापालिका बरखास्त करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. महापालिकेने मात्र यावर तोडगा काढल्याच सांगत सर्व प्रश्न निकालात काढण्यास थोडा अवधी लागेल अशी माहिती दिली आहे. 


केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना करण्याची हमी हायकोर्टाला दिली होती. यावर समाधान व्यक्त करत कोर्टानं केडीएमसीला तुर्तास नवीन बांधकामाकरता परवानगी दिली होती. दरम्यान केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत नेमके काय केले ते प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. आता १३ जुलै रोजी या याचिकेवरील पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.