गावा-गावांत स्थापन होणार डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर!

महा-ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रानंतर आता 'कॉमन सर्व्हिस सेंटर' अर्थात सीएससी डिजिटल सेवा केंद्र राज्य सरकारतर्फे सुरु करण्यात येत आहेत.

Updated: Oct 13, 2016, 01:51 PM IST
गावा-गावांत स्थापन होणार डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर! title=

मुंबई : महा-ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रानंतर आता 'कॉमन सर्व्हिस सेंटर' अर्थात सीएससी डिजिटल सेवा केंद्र राज्य सरकारतर्फे सुरु करण्यात येत आहेत.

हे सीएससी केंद्र हे प्रत्येक गावात सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावा-गावांत समन्वय साधण्यासाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी एक सीएससी वेल्फेर सोसायटी स्थापन करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. 

त्याच अनुषंगाने लातूर शहरात सीएससी वेलफेर सोसायटी कार्यालयाचे उदघाटन राज्याचे कामगार कल्याण तथा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यालयाच्या माध्यमातून आता प्रत्येक गावातील सीएससी केंद्रात सात-बारा, प्रमाणपत्रे, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व प्रमाणपत्रा व्यतिरिक्त आधार कार्ड, विमा क्षेत्र, बँकिंग, शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य भारत अशा ३० ते ४० सेवा या केंद्रामार्फत सुरु झाल्या आहेत. 

याशिवाय डिजिटल मतदान केंद्र, सायबर ग्राम, ई-ग्राम, मेडिकल-वैद्यकीय सेवाही लवकरच सुरु होणार आहेत.