माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'

काँग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण यांची आज तब्बल १० वर्षांनी घरवापसी झाली आहे. निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. 

Updated: Jan 28, 2015, 04:33 PM IST
माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी' title=

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण यांची आज तब्बल १० वर्षांनी घरवापसी झाली आहे. निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. 

माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता. 

तब्बल दहा वर्षांनी निम्हण यांची घरवापसी केली आहे. निम्हण 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. 

 

निम्हण यांचा मुलगा सनी निम्हण हा काँग्रेसचा नगरसेवक असून  युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.