मज्जा म्हणून उंच इमारतीवरून हवेत गोळीबार
नागपूर : नागपुरातील गाजलेल्या डब्बा ट्रेडिंग घोटाळ्यातले प्रमुख आरोपी, रवी अग्रवाल आणि गोपी मालू यांनी हवेत असा गोळीबार केला. परवानाधारक शस्त्रातून हा गोळीबार करण्यात आला.
नागपूर कळमना भागातल्या स्काय लाईनच्या वरच्या मजल्यावरून हा गोळीबार करण्यात आला. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आरोप नागपूर पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्त दीपाली मासिरकर यांनी ही माहिती दिली आहे. रवी अग्रवाल आणि गोपी मालू हे सध्या अंतरिम जामीनावर आहेत.